Wednesday 30 March 2016

Do You Know 'Abbreviation of Indian States'?

                 As we know that, now India is divided into 29 states and seven union territories. Since the Postal Service instituted ZIP codes and their accompanying state postal codes in 1963, the two-letter abbreviations have steadily gained popularity. Though it is usually preferable to write out the full name, space constraints often require use of an abbreviation.

These are below :-

Sr. No.
State
Abbreviation
1
Andhra Pradesh
AP
2
Arunachal Pradesh
AR
3
Assam
AS
4
Bihar
BR
5
Chandigarh
CH
6
Goa
GA
7
Gujarat
GJ
8
Haryana
HR
9
Himachal Pradesh

HP
10
Jammu and Kashmir
JK
11
Jharkhand
JH
12
Karnataka
KA
13
Kerala
KL
14
Madhya Pradesh
MP
15
Maharashtra
MH
16
Manipur
MN
17
Meghalaya
ML
18
Mizoram
MZ
19
Nagaland
NL
20
Orissa
OR
21
Punjab
PB
22
Rajasthan
RJ
23
Sikkim
SK
24
Tamil Nadu
TN
25
Tripura
TR
26
Uttarakhand
UK
27
Uttar Pradesh
UP
28
West Bengal
WB
29
Andaman and Nicobar Islands
AN
30
Chandigarh
CH
31
Dadra and Nagar Haveli
DH
32
Daman and Diu
DD
33
Delhi
DL
34
Lakshadweep
LD
35
Pondicherry
PY
36
Chhattisgarh
CG

 

Wednesday 23 March 2016

Cabinet Minister and their Portfolios in 2016

Cabinet Ministers



● Narendra Modi – Personnel, Public Grievances and Pensions, Department of Atomic Energy, Department of Space, All important policy issues and all other portfolios not allocated to any Minister
● Rajnath Singh – Home Affairs
● Sushma Swaraj – External Affairs, Overseas Indian Affairs
● Arun Jaitley – Finance, Corporate (Additional charge – Corporate Affairs, Information and Broadcasting)
● Manohar Parrikar – Defence
● M Venkaiah Naidu – Urban Development, Housing, Urban Poverty Alleviation, Parliamentary Affairs
● Nitin Gadkari – Road Transport and Highways, Shipping
● Suresh Prabhu – Railways
● Uma Bharati – Water resources, River Development and Ganga Rejuvenation
● Dr Najma Heptulla – Minority Affairs
● Ramvilas Paswan – Consumer Affairs, Food and Public Distribution
● Kalraj Mishra – Micro, Small and Medium Enterprises
● Maneka Gandhi – Women and Child Development
● Ananthkumar – Chemicals and Fertilizers
● Ravi Shankar Prasad – Communications and Information Technology
● Ashok Gajapathi Raju – Civil Aviation
● Anant Geete – Heavy Industries and Public Enterprises
● Harsimrat Kaur Badal – Food Processing Industries
● Narendra Singh Tomar – Mines, Steel, Labour and Employment
● Jual Oram – Tribal Affairs
● Radha Mohan Singh – Agriculture
● Thaawar Chand Gehlot – Social Justice and Empowerment
● Smriti Irani – Human Resource Development
● JP Nadda – Health and Family Welfare
● Birender Singh – Rural Development, Panchayati Raj, Drinking Water and Sanitation
● DV Sadananda Gowda – Law and Justice
● Dr Harsh Vardhan – Science and Technology Earth Sciences

Ministers of State (Independent Charge)

● General VK Singh – Statistics and Programme Implementation (Independent Charge), External Affairs, Overseas Indian Affairs
● Inderjit Singh Rao – Planning (Independent Charge), Statistics and Programme Implementation (Independent Charge), Defence
● Santosh Gangwar – Textiles (Independent Charge), Parliamentary Affairs, Water Resources, River Development and Ganga Rejuvenation
● Shripad Naik – Culture (Independent Charge), Tourism (Independent Charge)
● Dharmendra Pradhan – Petroleum and Natural Gas (Independent Charge)
● Sarbananda Sonowal – Skill Development, Entrepreneurship, Youth Affairs and Sports (Independent Charge)
● Prakash Javadekar – Information and Broadcasting (Independent Charge), Environment, Forest and Climate Change (Independent Charge), Parliamentary Affairs
● Piyush Goyal – Power (Independent Charge), Coal (Independent Charge), New and Renewable Energy (Independent Charge)
● Dr Jitendra Singh – Science and Technology (Independent Charge), Earth Sciences (Independent Charge), Prime Minister Office, Personnel, Public Grievances and Pensions, Department of Atomic Energy, Department of Space
● Nirmala Sitharaman – Commerce and Industry (Independent Charge), Finance, Corporate Affairs
● Bandaru Dattatreya – Labour and Employment
● Rajiv Pratap Rudy – Skill Development and Entrepreneurship (Independent Charge), Parliamentary Affairs
● Mahesh Sharma – Culture (Independent Charge), Tourism (Independent Charge), Civil Aviation

Ministers of State


● GM Siddeshwara – Civil Aviation
● Manoj Sinha – Railways
● Nihalchand – Chemicals and Fertilizers
● Upendra Kushwaha – Rural Development, Panchayati Raj, Drinking Water and Sanitation
● Pon Radhakrishnan – Heavy Industries and Public Enterprises
● Kiren Rijiju – Home Affairs
● Krishan Pal – Road Transport and Highways, Shipping
● Dr. Sanjeev Balyan – Agriculture, Food Processing Industries
● Mansukhbhai Dhanjibhai Vasava – Tribal Affairs
● Raosaheb Danve – Consumer Affairs, Food and Public Distribution
● Vishnu Deo Sai – Mines, Steel, Labour and Employment
● Sudarshan Bhagat – Rural Development
● Mukhtar Abbas Naqvi – Minority Affairs, Parliamentary Affairs
● Ram Kripal Yadav – Drinking Water and Sanitation
● HP Chaudhary – Home Affairs
● Sanwar Lal Jat – Water Resources, River Development and Ganga Rejuvenation
● Mohanbhai Kalyanjibhai Kundariya – Agriculture
● Giriraj Singh – Micro, Small and Medium Enterprises
● Hansraj Gangaram Ahir – Chemicals and Fertilizers
● Dr Ramshankar Katheria – Human Resource Development
● Jayant Sinha – Finance
● YS Chowdary – Science and Technology, Earth Science
● Rajyavardhan Singh Rathore – Information and Broadcasting
● Babul Supriyo – Urban Development, Housing and Urban Poverty Alleviation
● Niranjan Jyoti – Food Processing Industries
● Vijay Sampla – Social Justice and Empowerment -

Source:- http://www.allexamgurublog.com

Saturday 19 March 2016

2016 - 17 चा अर्थसंकल्प - अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सन 2016 - 17 चा अर्थसंकल्प मांडला , अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये


1.    पालकमंत्री पांदण रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना - शेतांमध्ये जाणारे वर्षानुवर्षे नादुरुस्त असलेले पांदण रस्ते दुरुस्तीसाठी तसेच जलयुक्त शिवार योजनेतील कामांसाठी पालकमंत्री पांदण रस्ते जेसीबी मशिन खरेदी योजना, या योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना जेसीबी खरेदीसाठी राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्जपुरवठा, या कर्जावरील व्याजाची हमी शासन घेणार, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद. 
2.    कृषी प्रक्रीया उद्योग योजना–  कृषी प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान, प्रकल्प खर्चाच्या 25 % किंवा जास्तीत जास्त 50 लाख मर्यादेत, यासाठी  50 कोटी रुपयांची तरतुद
3.    पंडीत दिनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शन योजना – या योजनेअंतर्गत कृषी विषयक उपक्रम, घडामोडी, संशोधन, समुपदेशन यासाठी  एकत्रितपणे मार्गदर्शन शेतक-यांना देण्यात येईल, यासाठी  60 कोटी रुपयांची तरतुद
4.    कृषी गुरुकुल योजना – शासनाद्वारे सन्मानित आदर्श शेतक-यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ राज्यातील इतर शेतक-यांना  देण्याची योजना.
5.    जिल्हा कृषी महोत्सव योजना - प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी कृषी महोत्सव भरविण्यात येईल. या माध्यमातून कृषी  विषयक योजनांची माहीती व मार्गदर्शन, यासाठी 20 लाख रु. प्रति जिल्हा प्रति वर्ष, यासाठी एकूण 6.80 कोटी रुपयांची तरतुद
6.     कृषी विद्यापिठांमध्ये सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना - सेंद्रीय शेतीचे महत्व लक्षात घेता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या चार कृषी विद्यापीठांमध्ये सेंद्रीय शेती, संशोधन व प्रशिक्षण केंद्रांची स्थापना
7.    गोवर्धन – गोवंश रक्षा केंद्रांची निर्मीती -  गोवंश रक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात भाकड व गोवंश संगोपन करण्यासाठी गोवंश गोवर्धन केंद्र स्थापन करणार, अनुभवी स्वयंसेवी संस्था मार्फत राबविण्यात येणार, यासाठी 1 कोटी रुपये एकरकमी देणार,  यासाठी 34 कोटी रुपयांची तरतुद
8.    जल साक्षरता व जलजागृती कक्षांची स्थापना - भविष्यात पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करण्यासाठी जल साक्षरता व जलजागृती केंद्रांची स्थापना करण्यात  येणार, कायमस्वरूपी केंद्र यशदा पुणे येथे, उपकेंद्र – चंद्रपुर, अमरावती व औरंगाबाद येथे स्थापन करणार
9.    मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम – राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात समाविष्ट नसणा-या योजना व बंद असणा-या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यांचे पुनरुज्जीवन यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राबविणार , यासाठी  2500 कोटी रु. ची तरतुद, या वर्षी 500 कोटी रु. उपलब्ध करणार.
10.    स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान- ग्रामपंचायती अधिक सक्षम होण्यासाठी, या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवित ग्रामपंचायतींचा विकास साधण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियान राबविणार, यासाठी  1 कोटी रुपयांची तरतुद.
11.     स्व. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना-महिला स्वयं सहायता बचत गटांना 0 टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्व. सुमतीताई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमिकरण योजना राबविणार , यासाठी  10 कोटी रुपयांची तरतुद.

12.    मुद्रा बँक कर्ज पुरवठा जिल्हास्तरीय समितीचे गठन – मुद्रा बॅंक योजनेच्या प्रसार व प्रसिद्धी साठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयात समिती स्थापन करणार, यामुळे जास्तीत जास्त तरुणांना योजनेचा लाभ मिळणार, यासाठी 20 कोटी रुपयांची तरतुद.
13.    राज्य महामार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहे - राज्य महामार्गावर दर 100 कि.मी. ला एक या प्रमाणे 400 स्वच्छतागृहे बांधण्यात येणार,  यासाठी 50 कोटी रुपयांची तरतुद.
14.    स्वत: चे घर नसलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा त्यांच्या हयात विधवांना घरे - स्वत: चे घर नसलेल्या स्वातंत्र्य संग्राम सैनिक किंवा त्यांच्या हयात विधवा यांना स्वत:चे घर बांधण्यासाठी 10 लाख रु पर्यत मदत, यसाठी स्वत:चे नावे किंवा पत्नीच्या नावे किंवा निकटवर्तीयांच्या नावे घर नाही अश्या स्वातंत्र्यसैनिकांना किंवा त्यांच्या हयात पत्नीला घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य.
15.    महिलांसाठी स्वतंत्र ‘तेजस्विनी’ बसेस – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबीवली, पुणे ,नागपुर या शहरातील महिलांना बस प्रवास सुखकर होण्यासाठी 300 बस स्थानिक प्राधिकरणामार्फत उपलब्ध करणार, यासाठी  50 कोटी रुपयांची तरतुद
16.    ई ग्रंथालये - 43 सार्वजनिक ग्रंथालयांचे रुपांतरण ई ग्रंथालयात करण्यात  येणार, प्रत्येकी 40 लाख अशी एकूण 17.20 कोटी रुपयांची तरतुद.
17.    2 कोटी वृक्ष लागवड - 1 जुलै कृषि दिन व वन महोत्सव यांचे औचित्य साधत राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवड करणार.
18.    नमामि चंद्रभागा- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपुरात लीन होणा-या चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेचे अभियान, चंद्रभागा नदी 2022 पर्यंत प्रदुषण मुक्त करणार,  शासन व लोकसहभाग  सदर अभियान राबविणार, यसाठी 20 कोटी रुपयांची तरतुद.
19.    आदर्श अंगणवाडी योजना – राज्यातील बालकांचा विकास करण्याच्या प्रक्रियेत महत्वपुर्ण भुमिका बजावणा-या 10,000 अंगणवाड्या आदर्श करणार, यासाठी 100 कोटी रुपयांची तरतुद.
20.     अंगणवाडी सेविका व मदतनिसांना विमा संरक्षण- प्रधानमंत्री जिवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याचा लाभ अंगणवाडी सेविका व मदतनिसांना देण्यात येणार, विम्याचा  हफ्ता शासन भरणार,  प्रत्येक योजनेअंतर्गत रु. 2 लाखाचे विमासंरक्षण.
21.    सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनांच्या अनुदानात वाढ - संजय गांधी निराधार  योजना , श्रावणबाळ योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्या इतर योजनांच्या अनुदानात वाढ करणार,  दोन अपत्य असणा-या लाभार्थींना 1000 रुपये, एक अपत्य असणा-यांना 850रुपये , अपत्यहिन लाभार्थ्यांना 700 रुपये, यामुळे शासनावर 332  कोटी रुपयांचा अतिरिक्त भार
22.     डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना- अनुसुचित जातीच्या शेतक-यांना विहिर खोदण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान, या विहिरीवर विद्युत पंप बसविणार, ज्याठिकाणी विद्युत पंप उपलब्ध नाही अशा ठिकाणी सौर ऊर्जा पंप बसविणार
23.    सार्वजनिक धोरण संस्थेची स्थापना - शासनाच्या ध्येय धोरणांसंदर्भात शास्त्रशुध्द विश्लेषण संशोधन व मुल्यमापन यासाठी जागतीक मानांकनाची महाराष्ट्र धोरण संशोधन  परीषद स्थापन करणार
24.    स्व. शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या रकमेत वाढ व प्रतिपुर्तीच्या नियमात कुटुंबियांचा समावेश -अधिस्विकृती धारक पत्रकारांना आजार व मृत्युपश्चात देण्यात येणा-या मदतीच्या निकषात कुटूंबीयांचा समावेश, योजनेसाठीच्या मदत ठेवीत 5 कोटीवरुन 10 कोटी इतकी वाढ
25.    सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून अभिनव उपक्रम - लोकमान्य टिळकांच्या “स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” या घोषणेला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकमान्यांच्या स्मृतीला अभिवादन करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबविणार, यासाठी 5 कोटी रुपयांची तरतुद.
26.    जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी  - जळगांव जिल्हयात चाळीसगांव तालुक्यात पाटणदेवी येथे जागतिक दर्जाची भास्कराचार्य गणित नगरी स्थापन करणार
27.    ज्येष्ठ पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकार भवनाचे बांधकाम - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे पत्रकार भवनाचे बांधकाम करणार.
28.    स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृती सभागृहाचे बांधकाम -  माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगली जिल्हयात सभागृहाचे बांधकाम  करणार, यासाठी 5 कोटी रुपयांची तरतुद.
29.    राज्यनाटय स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमेत तसेच सादरीकरणाच्या खर्चात वाढ – सांस्कृतिक कार्य संचालनाद्वारे आयोजित होणा-या राज्य नाटय महोत्सवाअंतर्गत घेण्यात येणा-या मराठी, हिंदी हौशी नाटय स्पर्धा, व्यावसायिक, संस्कृत, संगीत, बाल नाटय स्पर्धाच्या पारितोषिकांच्या रकमेत तसेच सहभागी संस्थांना देण्यात येणा-या सादरीकरण खर्च तसेच दैनिक प्रवास भत्ता यात वाढ करणार
30.    स्मार्ट गाव योजना – राज्यामध्ये यावर्षीपासून स्मार्ट गाव  ही नविन योजना जाहिर करण्यात येत आहे. याद्वारे राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याचा पध्दतशीर प्रयत्न. जिल्हास्तर, तालुकास्तर व पंचायत समिती गण स्तरावर ग्रामपंचायतीमध्ये स्पर्धा घेण्यात येणार. स्पर्धेतील विजेत्या गावांना विकास कामांसाठी प्रोत्साहनपर निधी.

योजनानिहाय तरतुदी
1.    सन 2016 हे शेतकरी स्वाभिमान वर्ष.
2.    अर्थसंकल्पाचा भर शेतकरी व ग्रामविकास.
3.    कृषी विषयक विविध योजनांसाठी 25000 कोटी एवढी भरीव तरतुद.
4.    डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी रु. 110 कोटी.
5.    2016 हे युनो ने आंतर राष्ट्रीय कडधान्य वर्ष जाहीर केले आहे.त्यामुळे तेल बिया व कडधान्य  उत्पन्नात वाढ करण्यासाठी रु. 80  कोटी.
6.    नविन कृषी महाविद्यालये – बुलढ़ाणा, हळगाव त. जामखेड जि अहमदनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालये, पाल जि जळगाव येथे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय, तर जळगांव आणि अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालये नव्याने स्थापन करणार.
7.    2065 महसुल मंडळस्तरावर स्वंयचलित हवामान केंद्र स्थापन करण्यसाठी रु. 107 कोटी.
8.    राष्ट्रीय कृषी विकास  योजनेंतर्गत नाबार्डच्या सहाय्याने शेतक-यांची उत्पादक कंपनी स्थापन करुन 100 कोटी किंमतीचे दुग्धविकास प्रकल्प विदर्भ व मराठवाड्यात उभारणार.
9.    मागेल त्याला शेततळे  योजनेसाठी रु.2000 कोटी,
10.    पिक विमा योजनेसाठी रु. 1855 कोटी,
11.    विकेंद्रीत धान खरेदी योजनेसाठी रु. 62 कोटी.
12.    जलयुक्त शिवार योजनेसाठी रु. 1000 कोटी,
13.    14 जिल्हयातील  शेतकर-यांना रास्त भावात धान्य देण्यासाठी रु. 1035.83 कोटी, 
14.    माजी मालगुजारी तलावांची मस्त्य संवर्धन  खड्ड्यांसह दुरुस्ती,  संवर्धन व नुतनीकरण करण्यासाठी रु. 150 कोटी, शेतकरी व मासेमारी करणा-यांना दिलासा.
15.    आदिवासी विद्यार्थांना नामांकीत शाळांमध्ये प्रवेशीतांसाठी रु. 290 कोटी,
16.    आदिवासी विभागा अंतर्गत रस्ते विकासासाठी रु. 300 कोटी,
17.    आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळा बांधकामासाठी रु. 370 कोटी,
18.    आदिवासी पोषण आहार योजना डॉ. ए पी जे अब्दुल कलाम योजनेसाठी रु. 112 कोटी,
19.    वारली कला जोपासना व संवर्धन अंतर्गत वारली हाट उभारण्यासाठी रु. 60 कोटी,
20.    अनुसुचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी साठी प्रमाण ऑनलाईन प्रणाली गुढी पाडव्यापासुन सुरु.
21.    अनु्सुचित जातींसाठी घरकुल योजनेअंतर्गत सन 2019 पर्यंत अनुसूचित जातीचे एकही कुटूंब बेघर राहणार नाही, राहत्या ठिकाणी किंवा भुखंड विकत घेऊन घरकूल बांधुन देणार, यासाठी रु 320 कोटी
22.    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमासाठी रु.170 कोटी.
23.    अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, प्रशिक्षण, पायाभूत सुविधा यांसाठी रु. 405 कोटी
24.    सिंचन प्रकल्पांसाठी रु. 7850कोटीची भरीव तरतुद, गेल्या अर्थसंकल्पात सिंचनासाठी जाहिर केलेली  रु. 7272 कोटीची तरतुद पुर्णपणे वितरीत
25.    सर्व ग्रामपंचायतींना डीजीटल बोर्ड बसवुन देणार, सर्वसामान्य नागरिकांना गावपातळीवरच सर्व प्रकारच्या शासकीय योजनांची सर्वकष माहिती उपलब्ध होणार.
26.    मुख्यमंत्री ग्रामसडक  योजनेसाठीरु. 500 कोटी.
27.    राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी रु. 170 कोटी.
28.    महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व राज्य रोजगार हमी  योजनेसाठी रु. 3473 कोटी
29.    बी ओ टी तत्वावर रस्त्यांचे दुपदरी करण व चौपदरी करण करणेसाठी रु. 550 कोटी
30.    हजार किमी चे राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग हायब्रिड अन्युटी माध्यमातून ८ वर्षात टप्प्या टप्याने सुधारणार
31.    केंद्र सरकारने केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत सन 2015-16 मध्ये रु. 4665 कोटीची नविन कामे मंजुर , स्वातंत्र्यानंतरची राज्याला मिळालेली आत्ता पर्यंतची सर्वात मोठी रक्कम
32.    सर्वांसाठी घरे 2022 – या केंद्रपुरस्कृत योजनेची काही सुधारणासह राज्यात अंमलबजावणी, राज्याचा सहभाग म्हणून रु. 700 कोटी.
33.    नविन चंद्रपुर विकास योजनेसाठी रु. 100 कोटी.
34.    महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानासाठी रु. 100 कोटी.
35.    नागपुर व पुणे मेट्रो प्रकल्पासाठी रु. 180 कोटी
36.    मुंबई मेट्रो -3 प्रकल्पासाठी रु. 90 कोटी
37.    ८ शहरांचे स्मार्ट सिटी प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातुन राबविणार
38.    राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान – माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रिकिकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रु. 137 कोटी.
39.    मुला मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी रु. 220 कोटी.
40.    सर्व शिक्षा अभियानासाठी रु. 740 कोटी,
41.    शालेय शिक्षण विभागांतर्गत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी रु. 180 कोटी
42.    श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती शताब्दी वर्षानिमित्त रु. 1 कोटीचे  अर्थसहाय्य.
43.    पोलिस गृहनिर्माण मंडळास रु. 320 कोटी
44.    सिसिटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसविण्यासाठी रु. 350 कोटी
45.    न्यायाधिशांच्या निवासस्थानासाठी व न्यायालयीन इमारतीसाठी रु. 491 कोटी
46.    अन्न सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी दर वर्षी 400 कोटी खर्च करण्यात येत आहे.
47.    तिवर संवर्धन प्रतिष्ठाणाच्या माध्यमातून समुद्र किना-यावरील लोकांचे जिवनमान उंचावण्यासाठी व्यवसाय व रोजगार वृद्धी
48.    माझी कन्या भाग्यश्री  या योजनेसाठी 25 कोटी
49.    आपले सरकार पोर्टल मार्फत 156 सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
50.    छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर स्मारक उभारले जात असल्यास राज्य शासन आर्थिक व भावनिक सहभाग देणार, यासाठी रु 5 कोटी
51.    महाराष्ट्र उद्योजकता  परीषद स्थापन करणार
52.    राज्य शासनाच्या नविन औद्योगीक धोरणामुळे जाने 2016 पर्यंत 8497 प्रकल्पांनी उत्पादन सुरु केले आहे. यात 262631 कोटी रु. ची गुंतवणूक करण्यात आली आहे, 11.23 लाख थेट रोजगार निर्मिती.
53.    उद्योग क्षेत्रातल्या सवलतीसाठी रु. 2650 कोटी
54.    वस्त्रोद्योग – कापुस उत्पादक भागात वस्त्रोद्योगाचा विकास व्हावा म्हणून विशेष लक्ष , विविध योजनांसाठी रु. 265 कोटी.
55.    कोकणातील विविध 5 जिल्हयातील जेट्टी विकास कार्यक्रमासाठी रु. 30 कोटी
56.    ससुन गोदी नुतनीकरण करण्यासाठी रु. 15 कोटी
57.    राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेसाठी रु. 300 कोटी
58.    नविन पर्यटन धोरण जाहीर, यासाठी रु. 285 कोटी, औरंगाबाद परीसरातील म्हैसमाळ, वेरूळ, सुलिभंजन पर्यटन विकासावर विशेष लक्ष

Thursday 17 March 2016

कल्पना चावला - भारतीय वंशाची पहिली अमेरिकन अंतराळवीर

कल्पना चावला - भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर

जन्मदिन - मार्च १७ इ.स. १९६२

आज दिनांक 17 मार्च डॉ कल्पना चावला यांचा  जन्मदिन.

कल्पना चावला ह्या जन्माने भारतीय असलेल्या प्रथम महिला आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेल्या दूसऱ्या भारतीय व्यक्ति होत्या. त्यांचा जन्म 1961 मध्ये हरियानामधील करनाल येथे झाला. कल्पना चावला यांच्या वडिलांचे नाव बनारसी लाल तर आईचे नाव संयोगिता चावला. त्यांच्या वडलांचे औद्योगिक वस्तु निर्मितीचा व्यवसाय होता आणि आई घर सांभाळायची. त्यांच्या आईला आपल्याला मुलगा व्हावा अशी इच्छा होती पण त्यांना कुठे ठावूक होते कि आपली मुलगी संपूर्ण जगात नाव कमावेल! त्यांचे शिक्षण टागोर विद्यालय येथून झाले.
1982 साली त्या अमेरिकेत गेल्या.
1984 साली त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस इंजीनिरिंग ची मास्टर ऑफ़ सायन्स ही पदवी मिळविलि. त्यांना अन्तराळविर होण्याच्या स्वप्नाने असे पछाडले होते की त्या वेळेस झालेल्या च्यालेंजर यान अपघाताची चर्चा देखिल त्यांना त्यांच्या ध्येयापासून विचलित करू शकली नाही.
त्यांनी 1986 मध्ये दूसरी मास्टर पदवी आणि 1988 मध्ये कोलेराडो मधून एरोस्पेस मध्ये डॉक्टरेट मिलविलि. 1988 मध्ये त्यांनी नासातील एम्स रिसर्च सेंटर ओवरसेट मेथड्सच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिले. तेथे त्यांनी कोम्प्यूटेशनल फ्लूइड डायनामिक्स मध्ये जागेवरच उभे उड्डाण, कमी अंतरात उड्डाण आणि जमिनीवर उतरणे या विषयांवर संशोधन केले.   त्यानंतर त्यांना ग्लाइडर्स, सीप्लेन्स तसेच एक किंवा अनेक इंजिन असलेली विमाने यांच्या व्यवसायिक वैमानिकांना प्रशिक्षण देण्याचा परवाना मिळाला.
1991 मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांनी नासामध्ये अॅस्ट्रॉनॉट कॉर्प्स होण्यासाठी अर्ज केला.
त्यांना मार्च 1995 साली तेथे प्रवेश मिळाला.
त्यांनंतर त्यांची 1996 मध्ये पहिल्या उड्डानासाठी निवड झाली.  यानात शून्य गुरुत्त्वकर्षणाच्या अवस्थेत असताना  त्या म्हणाल्या "तुमचे अस्तित्व हे तुमच्या हुशारीमुळे असते". त्यांनी अंतराळात 10.67 दशलक्ष किमि प्रवास केला हे अंतर 252 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याएवढे होते.
त्यांची पाहिली अंतराळ मोहीम 19 नोव्हेंबर 1997 रोजी चालु झाली. त्या 6 अंतराळविरांच्या चमुचा एक भाग होत्या.व  हा चमु कोलंबिया स्पेस शटल एस.टी.एस 87 चे चालन करत होता.  त्यांच्या पहिल्या मोहिमेत त्या 372 तास अंतराळात होत्या. एस.टी.एस-87 मोहिमेदरम्यान त्यांच्यावर नादुरुस्त असलेला स्पार्टन उपग्रह विंस्टन स्कॉट आणि तकाओं दोई यांच्याबरोबर स्पेसवॉक करुन तो दुरुस्त करने ही जबाबदारी होती. या मोहिमेनंतर त्यांना अंतराळ स्थानकावर काम करायचे होते.
चावला यांना 2000 साली त्यांच्या दुसऱ्या उड्डानासाठी एस.टी.एस 107 च्या चमु साठी देखिल निवडण्यात आले होते. परंतु ही मोहीम वारंवार आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे लांबलि जात होती.
16 जानेवारी 2003 रोजी चावला दुर्दैवी एस. टी. एस.107 मोहिमेवर जाण्यासाठी कोलंबिया अंतराळ मोहिमेवर आल्या.  चावला यांना सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात प्रयोग करणे ज्यामध्ये ते आणि त्यांच्या चमूला जवळ जवळ 80 प्रयोग करावयाचे असून त्यात पृथ्वी आणि अंतराळ विज्ञान, अद्ययावत तंत्रज्ञान निर्मिति, अंतराळविरांचे आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांचा समावेश होता.
चावला यांचा मृत्यु 1 फेब्रुवारी 2003 रोजी अंतराळ यान कोलंबियाच्या टेक्सास येथे पृथ्वीच्या वातावरणात पुनरप्रवेश आणि करताना जमिनीवर उतरताना  अपघातात झाला. त्यांच्यासोबत असलेल्या सर्व चमूचा त्यात दुर्दैवी अंत झाला.त्यांना मरणोत्तर  कांग्रेशनल स्पेस चे सन्मान पदक, नासा स्पेस फ्लाइट चे पदक तसेच नासा विशेष सेवा पदक बहाल करण्यात आले. कल्पना चावला यांच्या नावाने आय.एस.यू. शिष्यवृत्ति फंड हा इंटरनॅशनल स्पेस यूनिवर्सिटी (आय.एस.यू.) द्वारा आंतरराष्ट्रीय अंतराळ शिक्षण कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी 2010 साली सुरु करण्यात आला आहे. 
द कल्पना चावला मेमोरियल स्कोलरशिप प्रोग्राम भारतीय विद्यार्थी संघटना, टेक्सास विद्यापीठ, अल पासो यांनी 2005 पासून गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुरु केला आहे.'द कल्पना चावला आउटस्टैंडिंग रीसेंट अलुम्नी अवार्ड' हा कोलाराडो विद्यापीठाने जो 1983 पासून दिला जातो त्याचे नामकरण डॉ चावला यांच्या नावाने केले.  करनाल मध्ये चावला यांच्या जन्मगावि 30 हजार शालेय मुले आणि नागरिक यांनी हातात हात धरून 36.4 किमी लांब मानवी साखळी केलि होती. ही साखळी कल्पना चावला यांच्या नावाने शाहरामध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व्हावे याच्या समर्थनासाठी होती. 'कल्पना चावला मेडिकल कॉलेज निर्माण कमिटी' यात वेगवेगळ्या संस्थांचे  स्वयंसेवक आणि कार्यकर्ते तसेच चौतीस शाळांमधील विद्यार्थी यांचा समावेश होता.
18 नोव्हेंबर 2013 रोजी राज्य सरकारने पायाभरणी करतानाचा दगड त्यांच्या स्मृति निमित्त रोवण्यात आला.त्यांच्या स्मरणार्थ 51826 या अशनिला त्यांचे नाव देण्यात आले.
5 फेब्रुवारी 2003 मध्ये भारताच्या पंतप्रधानांनी हवामान विषयीच्या उपग्रहाला कल्पना-1 हे नाव दिले. त्यानंतर सोडलेल्या उपग्रहाला कल्पना-2 हे नाव देण्यात आले. हरियाणा सरकारने कल्पना चावला यांच्या नावाने ज्योतिसार,कुरुक्षेत्र येथे प्लेनेटेरियम सुरु केले.नासाने त्यांनी बनविलेल्या सुपर कंप्यूटरला कल्पना चावला यांचे नाव दिले.कल्पना चावला त्यांच्या मित्र आणि सहकर्मी यांच्यात के.सी नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांची आई सांगते कल्पना हि एक वेगळीच मुलगी होती. ती स्व:ताचे केस स्वतःच कापत असे, तीला कधी इस्त्री केलेले कपडे लागत नसत,तिने कराटेचे प्रशिक्षण घेतले होते. त्या पंजाब इंजिनियरिंग कॉलेज मधे अव्वल होत्या त्यांना त्याच कॉलेज ने नोकरी सूध्धा देवू केली होती. त्यांचे भाऊ संजय चावला म्हणतात कि, "माझी बहिण मरण पावलेली नाही तर ती अमर झाली आहे. ती एक आकाशातील कायमचा तारा झालेली आहे आणि तिच्या हक्काच्या जागेवर म्हणजेच आकाशात कायमची राहणार आहे"  त्या या शतकातील काही आदर्शांपैकी एक आहेत त्या सदैव आपल्या नावाशी जणू प्रामाणिकच राहिल्या. त्या आपल्याला त्यांचे धैर्य, जिद्द, चिकाटि, त्यांनी केलेले बलिदान आणि देशाला मिळवून दिलेला अभिमान यासाठी नेहमीच आठवणीत राहतील.
 डॉ.कल्पना चावला यांच्यापासून प्रेरणा घेऊन २०१३ मध्ये आपल्या नाशिक मध्ये सुद्धा काही खगोलप्रेमी तरुणांनी एकत्र येवून 'कल्पना युथ फाउंडेशन' या नावाची संस्था सुरु केली. या संस्थेचा उद्देश विद्यार्थी,पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करणे. नवीन अंतराळ मोहिमांबद्दल माहिती देणे, शाळा कॉलेजेस यांमधून व्याख्यान आणि प्रस्तुतीकरण करणे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांना मार्गदर्शन करणे. दुर्बीण बनविणे, विविध स्पेस क्राफ्टची मॉडेल्स बनविणे, अंतराळ विज्ञानासंबंधीच्या विषयांवर निबंध स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा घेणे, पॉवर पॉइंट स्पर्धा घेणे, आकाशदर्शन करवून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये अकाशाबद्दल कुतूहल तयार करणे अशी विविध कामे करते.    युनोच्या आशिया पॅसिफिकच्या अंतराळ शिक्षणाच्या राजदूत अपूर्वा जाखडी ह्या या संस्थेच्या मुख्य सल्लागार असून प्रोफेसर जयदीप शहा, प्रोफेसर भूषण उगले, पवन कदम, हेमंत आढाव, सुशांत राजोळे, विजय वैशंपायन, सारंग शाह, केतकी, मयुरी, दिपक तरवडे, दिपक सोनवणे, सुधाकर नागरगोजे, धनंजय लाखी हे काम बघतात. तसेच संस्थेची www.kalpanayf.org या नावाने वेबसाईट देखील आहे. तसेच फेसबुकवर देखीलआहे 'कल्पना वाय एफ' या नावाने पेज देखील आहे.

तसेच कल्पना युथ फाऊंडेशन यांनी याच आठवड्यात १५ मार्च रोजी अंतराळ विज्ञानाच्या अद्ययावत घडामोडी विद्यार्थ्यांकरिता पोह्चाव्या म्हणून एक पाक्षिक वृत्तपत्र सुरु केले आहे  जे सर्वांना अंतराळ विज्ञानासंबंधी आवड निर्माण करेल. हे वृत्तपत्र www.kalpanayf.org या website वर उपलब्ध आहे.