Wednesday 23 September 2015

Good News for Future Entrepreneur – ” प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना “

              

आजकाल आपल्या समाजात शिक्षनाचे प्रमान आता खूप प्रमानात वाढले आहे की त्यामुळे सुशिक्षित लोकांना स्व उद्यागाचे महत्व पटू लागले आहे. म्हणूनच शिक्षित तरुण आता ऊद्योग ऊभे करन्याच्या मागे लागत आहेत. त्यांनी इतर शिक्षित तरुणानाही उत्तेजित करणे, महत्वाचे आहे. आणि जेव्हा आपल्या समाजात जिल्हा व तालुका स्तरावर ऊद्योग सुरू होतील तेव्हा प्रत्येक तरुनांना मुंबईत रोजगार शोधन्याची गरजच भासनार नाही. मात्र प्रत्येक जन अडतो तो, आर्थिकदृष्ट्या. परंतु काळजी करन्यास काही कारण नाही कारण स्वताचे ऊद्योग ऊभे करन्याकरीता बँकाचे बर्याच योजना असतात किंवा जिल्हा ऊद्योग  खात्याकडुन बरेच ऊद्योग योजना असतात. त्याची माहीती जिल्हा ऊद्योग केंद्रातुन मिळेल. तसेच पंतप्रधान योजने तुन मुद्रा बँक ही योजना आहे, त्या बद्दल खाली माहीती देत आहोत.


 “मुद्रा बँक “:-


देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने ८ एप्रिल २०१५ रोजी २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड
रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन केले. या बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. या बँकेच्या मध्यमातून लघु उद्योगांना कर्ज देण्यासाठी देशातील इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येईल.
मुद्रा बँक योजनेत तीन श्रेणी असतील. त्यांचं
  1.     शिशू,
  2.     किशोर आणि
  3.     तरुण या गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे.

शिशू श्रेणीअंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज दिले जाणार आहे.

तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल.
तसेच तरुण श्रेणीअंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळेल. ज्यांना नवा उद्योग, काम सुरु करायचे असेल, त्यांनाही कर्ज मिळेल. त्याचबरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाईल. पंतप्रधान मुद्रा योजनेत प्रत्येक सेक्टरनुसार स्कीम बनवल प्रत्येक सेक्टरमध्ये वेगवेगळ्या स्कीम असतील.
‘सिडबी’ची उप कंपनी या नात्याने मुद्रा बँक ही रिझव्र्ह बँकेकडे बिगर बँकिंग वित्तसंस्था म्हणून नोंदणीकृत होईल आणि रिझव्र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली ती काम करेल.

मुद्रा योजनेची वैशिष्टय़े……

देशातील ५.७७ कोटी उद्योजकांना वित्तसाहाय्य वार्षिक ७ टक्के दराने १० लाख रुपयांपर्यंत अर्थपुरवठा २०,००० कोटींचे भक्कम सरकारचे भांडवली पाठबळ सिडबीची ही उपकंपनी रिझव्र्ह बँकेच्या अखत्यारीत येणार सूक्ष्म वित्त संस्थेव्यतिरिक्त बँकेकरिता स्वतंत्र विधेयक लोन मध्ये खालील प्रमाणे माहिती आहे

1) कोणत्याही प्रकारचा जामीन नाही
2) कोणत्याही प्रकारचा मॉरगेज नाही
2) हि योजना फक्त सरकारी बैंक तच होते
3) वय 18 वर्षे पूर्ण असली पाहिजेत
4) या साठी ची कागदपत्रे
खालील प्रमाणे
@) ओळखीचा पुरावा उदा – मतदान ओळख पत्र,
आधार कार्ड
@) रहिवासी पुरावा उदा – लाईट बिल, घरफाळा
पावती
@) आपण जो व्यवसाय करणार आहोत कींवा करत
आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता
@) व्यवसायासाठी लागणारे माल मटेरियल किंवा
यंत्रसामुग्री त्याचे कोटेशन व बिले
@) आपण ज्या व्यापार्या कडुन माल घेतला त्याचा पुर्ण नाव व
पत्ता
@) अर्जदाराचे 2 फोटो
@) अर्जदार कोणत्याही बॅन्केचा
थकबाकीदार नसावा इत्यादि
5) कोणतीही सरकारी बॅन्क
कर्ज नाकारू शकत नाही
6) स्वतःचे 10 टक्के भागभांडवलची गरज नाही

हि माहीती प्रत्येकाने काळजी पुर्वक वाचुन आपला ऊद्योग ठरवा , अगोदर बँक मँनेजर लगेच तयार होनार नाही , त्यांना केंद्र सरकारचा पेपर दाखवा आणि तरीही तयार झाला नाही तर त्याच्या बँकेच्या लेटरपँड वर त्याच्याकडुन मुद्रा चे लोन करीत नाही म्हणुन लिहुन घ्या. व ते सर्व पेपर  आम्हाला
isra150413@gmail.com व bhau.1970@rediffmail.com या मेल आय डी वर पाठवा .
नंतर त्या बँक मँनेजर वर काय कारवाई करायचे ते पंतप्रधान कार्यालय ठरविल. परंतु आपल्या सर्व समाज बांधवानी नाऊमेद न होता, उद्योग ध्येयवेडे व्हॉ. आपन कुठेही अडकलाच तर आम्ही इंडियन सोशालिष्ट रिपब्लिकन असोशिएन ची महाराष्ट्र टिम तुमच्या सोबतीला असेलच. तर चला
आजपासुन आपला समाज ऊद्योगपतीचा समाज बनवु या. व आपल्या समाजाला “स्वॉवलंबि समाज ” बनविन्याच्या प्रकियेकडे नेऊ या.