Saturday 6 June 2015

रीटेल मॅनेजमेंट मध्ये करियर . . .

retail-management-1-638

रीटेल मॅनेजमेंट मध्ये करियर

मेट्रो शहरातील डिपार्टमेटल स्टोर आणि मॉलची वाढती संख्या आणि ग्राहककडून मोठ्या प्रमाणात होणारे स्वागत लक्षात घेता पुढील 1-2 वर्षात हजारो लोकांना रोजगार मिळवण्याची शक्यता प्रगल्भतेने दिसून येत आहे. अन त्यासोबतच आगामी संधी लक्षात घेऊन ‘शिका आणि कमवा’ या उपक्रमा अंतर्गत तीन वर्षाची  डिग्री निशुल्क दरात करण्यास मिळत आहे. या शेक्षणिक उपक्रमाचा उद्देशच आपल्या समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थांचे एक व्यावसायिक व्यक्ति म्हणून अस्तित्व निर्माण करणे आणि ज्ञान, संकल्पना आणि किरकोळ सहभागी प्रक्रिया समजून घेऊन विश्लेषणात्मक कौशल्य विकसित करणे, असे असल्याचे दर्शविले आहे.

इंटीग्रेटेड अर्थात रीटेल – कम – इंटरटनमेंट :
- डिपार्टमेटल स्टोर चे एक वैशिष्ट्य म्हणजे ‘खरेदीसोबतच मनोरंजन’-  येथे ग्राहकना विविध सेवा देण्यासोबतच त्यांचे मनोरंजन देखील केले जाते. मोठ्या शहरामध्ये या क्षेत्राचे क्रेझ वाढले आहेत.  मेगा स्टोर्समध्ये डिजिटल डॉल्बी असलेले चित्रपट गृह देखील असतात. त्यामुळे या क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तरुणांना मोठा वाव आहे.

फ्रंटलाइन सेल :-   फ्रंटलाइन सेलसाठी स्मार्ट आणि आकर्षक पर्सनलीटी असलेल्या एक्झिक्युटिवची आवश्यकता असते. त्यासाठी विशेष अशा अभ्यासक्रमाची आणि प्रशिक्षणाची गरज असते. त्यामुळे आजच्या काळात मेट्रो शहरातील रीटेल  कोंपांनीसाठी विविध क्षेत्रात प्रावीण्य आणि शिक्षण आणि प्रशिक्षण मिळवलेल्या तरुणांना मोठी मागणी आहे. उमेदवाराला स्थानिक भाषेसह एंग्रजी व हिन्दी भाषेची जान असणेही गरजेचे आहे.

कस्टमर फेसिंग :- कस्टमर अर्थात ग्राहकाशी डायरेक्ट डील करण्यासाठी प्रोफेशनलस काम पाहत असतात. कस्टमर केयर, सेल्स एक्झिक्युटिव, प्लोर मॅनेजर, डिपार्टमेंट मॅनेजर व प्रमोशन मॅनेजर आदि भाग आहेत.

बँक ऑफिस :- या विभागात कामाचा भडिमार अधिक असतो. योग्य प्रॉडक्टची निवड करणे, मागणी तसा पुरवठा करणे  अशा प्रकारची कामे बँक ऑफिस एक्झिक्युटिवला असतात. या विभागासोबतच अकाऊंट विभाग, कम्प्युटर ऑपरेटर, facilities विभाग व एचआर विभाग यादींची लिंक असते.

पात्रता : – 

– या क्षेत्रात काम करण्यासाठी उमेदवारच्या अंगी प्रामुख्याने सहनशीलता हा गुण असणे गरजेचे आहे.

– त्यासोबतच वेळेचे नियोजन, झटपट काम करण्याचे कौशल्य, कस्टमरचे मानसशास्त्र ओळखण्याची जाण असणे गरजेचे आहे.

3 वर्षाची डिग्री

शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार ही साखळी लवकरच आपल्या हाती घेण्यासाठी तुम्ही लवकरच Mumbai University ला लवकरच साधु शकता आणि या संधीचे सोने करू शकता.

No comments:

Post a Comment