Saturday, 28 November 2015

जाणुन घ्या :- मोफत शिक्षणाचा अधिकार (Right to education act कलम 21)

Right TO Education Act


“शिक्षण हेच वाघीणीच दुध आहे”, या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ४०% अपंगत्व  व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थांना शिक्षणाचा अधिकार या कायद्या द्वारे २५% आरक्षण देण्यात आलेले आहे. हे शिक्षण संपूर्णपणे मोफत असून त्यांचे प्रवेश online करण्यात आले आहे, याची नोंद सर्व पालकांनी लवकरात लवकर करून घ्यावी व त्यानुसार नजीकच्या अधिकृत केंद्रात आपल्या मुलांचा अर्ज भरून घ्यावा.
मात्र अजूनही कित्येक मुले व मुली शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाची आवड असुनुही donation सारख्या system मुळे तरुण पिढीचा कौल चोरी, दरोडा , तस्करी, भिक मागणे, निरक्षरता याकडे वाढत चालला आहे. या साऱ्या वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि देशाच्या Secure  Future साठी “शिक्षणाचा समान अधिकार” हा एकमेव उपाय असल्याचे स्पस्थ झाले आहे. यासाठीच आपण सर्वांनी हि अत्यंत महत्वाची माहिती प्रत्येक गरजू लोकापर्यंत पोहोचवावी, अशी आशा आहे.

जाणुन घ्या :- मोफत शिक्षणाचा अधिकार (Right to education act कलम 21):-


मोफत शिक्षणाचा अधिकार (Right to education act कलम 21) नुसार आपल्या पैकी कुणालाहि आपल्या बालकाचे चांगल्या शाळेत admission करायचे असेल तर डिसेंबर ते मार्च महिन्यात rte25admission.maharashtra.gov.in या site वर admission form भरु शकता. आणि आपल्या जवळच्या योग्य शाळेत आपल्या मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार मिळवून देऊ शकता.

प्रवेश अर्ज सादर करतेवेळी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

1)रहिवाशी पुरावा आधार कार्ड/पास पोर्ट/निवडणूक ओलखपत्र/घरपट्टी/वाहन परवाना यापैकी एक
2) जातीचे प्रमाणपत्र
3)कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला(अनुसूचित जाती ,जमाती, नवबौद्ध,४०% अपंग,यांना उत्पन्नाची अट नाही.
4)जन्माचा दाखला
5)अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
6)बालकाचे छायाचित्र

अट :-

1)  CBSE / State school मध्ये प्रवेशाकरिता online अर्ज स्वीकारण्याचा कालावधी डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६.
2) अनुसूचित जाती आणि जमाती, ४०% अपंगत्व, यांना उत्पनाची अट नाही.
3) आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना उत्पन्नाची अट  १,००,०००/-रु आहे.

Please note  :-

कदाचित तुम्ही सध्या ज्या शाळेत तुमच्या बालकांना admission करून दिले आहे. ती सुद्धा RTE अंतर्गत असु शकते,परंतु तुम्ही तिथे मोठ मोठी फ़ीस भरत असाल, म्हणुन एकदा वरच्या website ला नक्की भेट दया..

आपल्या विभागातील प्रत्येक मुलापर्यंत हि योजना पोहोचवावी, हि विनंती.

कारण आपल्या पैकीही ९०% लोकांना या अधिकाराची काहीही माहिती नाही. म्हणून तुम्ही या योजनेच्या प्रचार प्रसाराकरिता हातभार लावावा ही नम्र विनंती.

RTE फोर्म भरणे, आता झाले आहे अगदी सोपे. फोर्म भरताना सर्व माहिती आपोआप मिळत जाते आणि म्हणजे तुमच्या पाल्याचा सबंधित शाळेत नंबर लागला असल्यास तुम्हाला तिथे भांडण करण्याची किंवा काहीही खटाटोप करण्याची गरज नाही.

तुमचा फोर्म हाच तुमचा ठोस पुरावा असेल. त्यामुळे शाळेतील कर्मचार्यांनी काही कीटकीट केलीच कि आपण शाळेची तक्रार शिक्षण अधिकाऱ्याकडे करून शाळेची ग्रंत सुद्धा कडून घेऊ शकतो.

सुचना:- अल्प संख्यांक शाळा सदर उपक्रमात सामिल राहणार नाहीत,सदर योजना ही केवळ 1ली ते 8 वीच्या वर्गांकरिता आहे.( फक्त 6 ते 14 वयोगटासाठी).

No comments:

Post a Comment