Saturday 15 August 2015

Do You Know Your “Fundamental Duties AS an Indian Citizen”?


भारतीय नागरिक म्हणून आपली ही कर्तव्य पार पाडूयात !

1) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

2) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे.

3) भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे.

4) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेंव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.

5) धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.

6) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृध्द वारशाचे मोल जाणून तो जतन करणे .

7)  वने , सरोवरे नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दया-बुद्धी बाळगणे.

8) विद्न्याननिष्ट दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे.

9) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.

10) राष्ट्र सतत , उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल  अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे.

11) मातापित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा , यथास्थिती, पाल्याला शिक्षणाची संधी देणे.

जस आपण आपले हक्क/अधिकार सांगतो तसेच आपण आपले कर्तव्य पार पाडने महत्वाचे आहे .

                             संदर्भ:- “भारतीय संविधान” भाग-4, कलम 51 क

No comments:

Post a Comment