Thursday 31 December 2015

!! प्रिय व्यक्ती . . .माझ्या आयुष्यातले !!

              आयुष्याची वळणे पार पडताना आपली कित्येक व्यक्तीशी भेट होत असते. आणि आपण प्रत्येक व्यक्तींना त्यांच्या नावानुसार ओळख न ठेवता .. जास्तकरून स्वभावानुसारच आपलेसे करत असतो. अन त्यातच काही व्यक्ती इतके भारी असतात कि, आपली वांरवांर त्यांच्याशी गाठ पडावी, असे वाटत राहते.
खरंच काही लोकांच जीवनच एकदम झक्कास असत ! त्या व्यक्तीमध्ये एक वेगळेपणाच असतो . . जो प्रत्येकाच्या मनाला भावत असतो. गतकाळात घुसमट राहण, मागील वाटेत ताटकळत जगणे त्यांना कधीच पटत नाही. याहून प्रत्येक नवीन उगवणाऱ्या दिवसासोबत नवीन चांगला बदल करत जगणे, त्यांना खूप आनंद दायक वाटते. अन अगदी योग्यही. अशी लोक स्वत: तर आयुष्याची मजा लुटतातच, परंतु सोबतच इतरांनाही आयुष्याच्या मागच्या पानात अडकून न राहता . . . आयुष्याची पुढची सुंदर पाने सजवायला सज्ज करतात.

            बहुंताश लोकांपेक्षा त्यांना जीवन जगण्याच वेगळंच सौंदर्य लाभलेलं असत. जीवनाच्या प्रत्येक वळणावर जगताना तो क्षण सुंदरतेने  उपभोगण्याचा आणि योग्य तो जगण्याचा दृष्टीकोन त्यांनी जोपासलेला असतो. अन त्या व्यक्ती स्वभावाहून पलीकडे म्हणजे असेही काही लोक असतात, जे स्वत:च्या आयुष्याची दोर नियतीच्या हात देऊनच नियतीच्या तालावर नाचणे पसंत करतात. किंबहुना आयुष्याचा क्षण न क्षण जगणारी व्यक्ती मात्र नियतीला दोष न देता . . जे काही बर -वाईट चालू आहे . . . ते फक्त स्व:कर्मामुळे  . .हे उमजून त्यातून बाहेर कसे निघायचे . .याचा शोध घेत असतात. यातच त्यांच्या वृत्तीतील झक्कासपना अन चांगुलपणा उठून दिसतो. अशा व्यक्तीशी भेट घडली कि वांरवांर त्यांचा चेहरा आठवून कठीण प्रसंगातही चेहऱ्यावर ‘स्मित-हास्य‘ येते. त्यांचा आत्मविश्वास पाहून आपणही जीवनात काहीतरी करून दाखवू  . .. सार्थकी ठरू . . हा त्यांचा आत्मविश्वास मन भारावून टाकते. आणि आपणही त्यांच्या सारख बनाव. . .त्यांच्या पावलावर पाउल टाकत झक्कास व्यक्ती बनावी, अशी आशा मनात दरवळू लागते.

         मात्र आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावे कि, चांगल्या व्यक्तीची व्याख्या करताना समजून घ्यावे कि,  चांगला व्यक्ती म्हणजे तो शिस्तप्रिय, अनुशास्नात जखडलेलाच असावा . . असे काही बंधनकारक नसते. उलट त्याहून कृतीतील सातत्य जपणारा, उक्तीप्रमाणे कृती असणारा, वागण्यातला निशिद्प्ना, स्व:वृत्तीवर प्रेम करणारा आणि सोबतच इतरानाही खुश ठेवणारा आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक असा असावा.

        आता नवीन वर्ष येत आहे. प्रत्येक जन वर्षाच्या अखेरीस आपला संकल्प साधण्यास सुरुवात करतात. खूप सारे संकल्प आखण्याऐवजी आपण माणूस म्हणून जीवनाचा क्षण न क्षण कसा जगू आणि इतरानाही जगण्यास शिकवू. असा संकल्प नक्की साधू आणि आपल्यातील प्रिय व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करू, अशी आशा बाळगूया.

      
तुमचीही अशाच प्रिय व्यक्तीशी गाठभेट झाली असेल. तुम्ही हि त्या व्यक्ती बद्दल प्रिय व्यक्ती म्हणून मनात असेच एक व्यक्तिरेखा जोपासून ठेवली असल्यास तुम्हाला भेटलेल्या व्यक्ती बद्दल तुमची मते comment मध्ये सांगू शकता,

अथवा mail करू शकता – justlearntoday@gmail.com

No comments:

Post a Comment